नगर,(दि.07 नोव्हेंबर) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेच्या वतीने देण्यात येणारा स्व. सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्कार 2020 यावर्षी नगरचे युवा लेखक दिगदर्शक कृष्णा वाळके व अभिनेता , निर्माता स्वप्नील मुनोत यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेचे अध्यक्ष उमेश घेवरीकर यांनी दिली.
यापूर्वी हे पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम व लेखक ,दिगदर्शक संदीप दंडवते यांना देण्यात आले असून या वर्षी आपल्या प्रतिभेच्या बळावर स्वतः सोबत नगरच्या मातीतील कलावंतांना सांस्कृतिक क्षेत्रात सन्मान मिळवून देणाऱ्या कृष्णा वाळके व स्वप्नील मुनोत यांना हे पुरस्कार रविवार दि 8 नोव्हेंबर रोजी एका छोटेखानी कार्यक्रमात अमरापूरकर कुटुंबियांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती शाखेचे उपाध्यक्ष भगवान राऊत व कार्यवाह माफीज इनामदार यांनी दिली.
पुरस्कारांची निवड शेवगाव नाट्य परिषदेचे मार्गदर्शक व जेष्ठ रंगकर्मी प्रा. रमेश भारदे व मधुकर देवणे यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली.
