नगर, (दि.03 नोव्हेंबर): ट्रॅव्हल्समधून प्रवासा दरम्यान कोठला येथे पुण्याच्या दाम्पत्याची बॅग अज्ञात चोरट्याने लांबविली. चोरट्याने बॅगमधील सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम असा एकूण 1 लाख 65 हजार 200 रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी पहाटेच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी विलास मधुकर जगताप (रा. प्रतीकनगर, पुणे) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जगताप हे पत्नीसह सिंध ट्रॅव्हल्स (एमएच 37 टी 7779) मधून प्रवास करीत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने बॅगमध्ये ठेवलेले 1 लाख 35 हजाराचे सोन्याचे गंठण, 8 हजार 700 रूपयांची रोख रक्कम व एटीएममधून काढलेली 21 हजार 500 रूपयांची रक्कम तसेच कागदपत्र लांबविले.
पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण सुरसे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक घायवट करीत आहेत.
