नगर, (दि.01 नोव्हेंबर ) : कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरीतील एका जणाकडून दोन तलवारी व अंबर दिव्यासह वाहन पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एकाला अटक करुन सव्वापाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दत्तू सकळ (रा.टाकळी खंडेश्वरी, ता.कर्जत),असे आरोपीच नांव आहे. टाकळी खंडेश्वरी येथे एका व्यक्तीने घरामध्ये तलवारी व वाहनासह अंबरदिवा लपवून ठेवल्याची माहिती उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना मिळाली. त्यानुसार पथकाने टाकळी खंडेश्वरी येथे छापा घालून आरोपी दत्तू मूरलीधर सकळ याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दोन तलवारी, अंबरदिव्यासह एक वाहन जप्त केले आहे.
दत्तू सकट याच्याविरुध्द कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस कर्मचारी केशव व्हरकटे, हदय घोडके, सागर जंगम, आदित्य बेलेकर यांच्या पथकाने केली आहे.
