जळगाव, (दि.01 नोव्हेंबर ) : राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. खडसेंच्या कारचे टायर फुटून जळगावमध्ये हा अपघात झाला. यामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
खडसे हे अमळनेर येथील कार्यक्रम आटोपून जळगावकडे निघाले असता यांच्या वाहनाला अपघात झाला. खडसेंच्या गाडीचे टायर फुटले, मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडीवर नियंत्रण मिळवले. खडसेंसह गाडीतील सर्व जण सुखरुप असून कोणालाही इजा झालेली नाही.
