नगर, (दि.18 नोव्हेंबर) : पाईपलाईन रोडवरील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणी गंठण बळजबरीने चोरुन चोरट्यांनी पोबारा केला.
माहिती अशी की, छाया किशोर काळे (वय 46, रा.आयोध्यानगर, पाईपलाईन रोड,नगर) या त्यांच्या मोपेड मोटारसायकलवरुन घरी चालल्या होत्या.
त्या घरी जात असताना एका काळ्या रंगाचा टि शर्ट परिधान केलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची मणी गंठण बळजबरीने ओढुन तोडुन नेले आहे.
या घटनेची माहिती त्यांनी तोफखाना पोलिसांनी देऊन जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
