नगर, (दि.18 नोव्हेंबर) : सावेडी उपनगरातील निर्मलनगर भागात चोरट्यांनी सोन्याचे गंठण, आंगठ्या, मणी, चांदीचे कडे यासह रोख रक्कमेवर डल्ला मरला आहे. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहिती अशी की, परमेश्वर गणपती राजुरे (वय 31, धंदा नौकरी, हल्ली राहणार दत्त दिगंबर हौसिंग सोसायटी, बाबा चौक, निर्मलनगर, मुळ राहणार मु.पो.हडोळती, ता.अहमदपुर, जि.लातुर) हे राहत असलेल्या घरामध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे दरवाजा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करून सामानाची उचकापाचक केली.दिवानचे कप्प्यात ठेवलेली सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. चोरट्यांनी सुमारे एक लाख 33 हाजार रुपयांचा मालावर डल्ला मारला आहे.
यामध्ये 62 हजार 500 रुपयांचे 2.5 तोळे वजनाचे गंठण, 25 हजार रुपये किंमतीच्या 2 सोन्याच्या आंगठ्या, 10 हजार रुपये किंमतीच्या 4 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 2 हजार 500 रुपयंचे एक ग्रॅम सोन्याची आंगठी, 7 हजार 500 रुपये किंमतीचे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी, 5 हजार रुपये किंमतीचे 2 दोन ग्रॅम वजनाचे ओम, एक हजार रुपयांचे चांदीचे कडे, 20 हजार रुपये किंमतीचे वेगवेगळ्या दरांच्या नोटा असा एकुण 1 लाख 33 हजार 500 रुपयांचा माल चोरट्यांनी चोरुन नेला आहे.
परमेश्वर गणपती राजुरे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास तोफखाना ठाण्याचे पोना डी.आर.जाधव करत आहे.
