केडगाव, (दि.18 नोव्हेंबर) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२० मध्ये केडगाव येथील श्री अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयातील आठवीच्या एका विद्यार्थ्याने राज्य गुणवत्ता यादीत तर पाचवीच्या चार विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.
विद्यालयातील इयत्ता आठवीचा विद्यार्थी अनुज्ञ वराडे या विद्यार्थ्याने २७२ गुण मिळवून महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीमध्ये ८ वा क्रमांक मिळविला आहे. तसेच इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी अनुष्का दंरदले (२२२ गुण), प्रसाद डमाळे (२१८ गुण ), कु.वायबसे मयुरी वायबसे ( २०० गुण), रुद्राराज सरोदे (२०० गुण ) अशा एकूण पाचवीच्या चार विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव माध्य. एस.बी नागपुरे विद्यालयाचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अधिकारी टी.पी. कन्हेरकर,स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रभाकर गुंड व सर्व सदस्य, रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव शिवाजीराव भोर , पर्यवेक्षक के.एस. भिटे,गुरुकुल प्रमुख के.के. आठरे सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
या विद्यार्थ्यांना पाचवी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख गाडीलकर एस.बी. व जगदाळे बी.एन.बडवे ए.एल.,सौ.औटी एस.एस. तसेच आठवी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख अकोलकर के.बी.व तंटक आर.डी. श्रीम.दरंदले आर.डी. सौ.काळे एन.एस. रोहोकले के.एस. यांचे मार्गदर्शन लाभले.
Tags:
Ahmednagar

abinanadan
ReplyDelete