साहेब पुढील काळात राष्ट्रवादीत येणार्‍यांची मालिका मोठी : जयसिंगराव गायकवाड

जयसिंगराव गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश


मुंबई, (दि.25 नोव्हेंबर) : भाजपचे जेष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी आलोय साहेब, येणार्‍यांची मालिका फार मोठी आहे’, अस सुचक इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे.


मराठवाडा पदवीधर मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपच्या जयसिंगराव गायकवाड यांनी बंड करत आज अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला.


यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती टीका करत मोठे गौप्यस्फोट केले. ‘आता मी आलोय साहेब, येणार्‍यांची मालिका फार मोठी आहे. ते आता सगळेच बाहेर येणार आहेत’ अशा शब्दात जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला मोठा धक्का बसणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.


जयसिंगराव गायकवाड यांच्या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, अनिल देशमुख, धनंजय मुंडे यांच्यासह आणखी काही नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना जयसिंग गायकवाड यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post