नवीदिल्ली, (दि.25 नोव्हेंबर) : कोरोना लसीच्या निर्मितीत होणार्या प्रगतीच्या बातमीमुळे सोनं दिवसेंदिवस स्वस्त होत चाललं असल्याचे जाणकारांचे मत आहे. गेल्या 5 दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे.
तसेच शेअर बाजारात तेजी आहे. 19 नोव्हेंबरपासून सोन्याच्या किंमती प्रतितोळा 1000 रुपयांपेक्षा जास्त खाली आल्या आहेत. देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याची किंमत पुन्हा प्रति 10 ग्रॅम 50,000 रुपयांपर्यंत खाली आली आहे.
तर चांदीदेखील जवळपास तीन टक्क्यांनी घसरून होवून 60,300 रुपये प्रति किलो झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोमवारी सोन्याच्या भावात दोन टक्क्यांहून अधिक घसरण झाली, तर चांदी तीन टक्क्यांहून अधिक स्वस्त झाली.
Tags:
Maharashtra
