नगर, (दि.23 नोव्हेंबर) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी एमडी यशवंतराव भंडारे यांची सून व जिल्हा एम्प्लॉईज युनियनचे कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे यांची पत्नी अश्विनी यांचे रविवारी सकाळी दुचाकीला ट्रेलरची धडक बसून अपघाती निधन झाले.
नगर-अौरंगाबाद रस्त्यावरील स्टेट बँक चौकात हा अपघात झाला. त्यांच्यामागे पती, दोन मुली, सासू, दीर, पुतणे असा परिवार आहे. लायन्स क्लब, योगा, महिला फिटनेस क्लब, तसेच अनेक सामाजिक संस्थांवर त्यांनी काम केले.
Tags:
Ahmednagar
