नगर, (दि.21 नोव्हेंबर) : तोफखाना येथे जुगाराचा क्लब व वाडियापार्कजवळ सोरट खेळणार्या तब्बल 16 जणांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. 35 हजार रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
तोफखाना येथे पवन झुंबरलाल कोठारे (वय 53, रा. शिरूर,जि.पुणे), विनोद डॅनिअल ससाणे (वय 27, रा. सिध्दार्थनगर, नगर), गुलाब मौला शेख (वय 55, रा. आष्टी. जि. बीड), श्यामसुंदर बारकू रोकडे (वय 58, रा. तोफखाना) संतोष अशोक कोठेकर (वय 43, रा. सिव्हील हडको), रमेश गोपीनाथ मिसाळ (वय 33, रा. हातमपुरा), दत्तात्रय खुशालचंद गिरमे (वय 34, केडगाव) हे सर्व आरोपी तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांना समजली.
त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी छापा टाकून कारवाई केली. यावेळी जुगार खेळणार्यांकडून 33 हजार 610 रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
तर वाडिया पार्कजवळ सोरट खेळणार्या मुजाहिद जब्बार खान (वय 34, रा. झेंडीगेट), सद्दाम सिकंदर खान (रा. झेंडीगेट), स्वप्निल गोविंद दरोडे (वय 23, रा. केडगाव), अभिषेक उमेश फुलसौंदर (वय 28, रा. फुलसौदर मळा), नितीन नंदू काळे (वय 34, बुरूडगाव रोड), शमशोद्दीन महेबूब बिराजदार (वय 34, बुरुडगाव, तांबेमळा) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व जण सोरट नावाचा जुगार खेळत होते. त्यांच्याकडून एक हजार 390 रुपये आणि जुगाराचे सहित्य जप्त करण्यात आले आहे. या दोन्ही कारवाई प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
