निंबळकला जाणारे सर्व रस्ते बंद


नगर, (दि.27) : नगर तालुक्यातील निंबळक येथे कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे ग्रामसुरक्षा समितीने गावात येणारे सर्व रस्ते दोन किमी अंतरापर्यत 8 जून पर्यत बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने चौदा दिवस बंद करण्यात आले आहे.

निंबळक (ता. नगर) येथे तीस वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. सदर महिला चेंबूर येथून आली होती. चेंबूर वरुन निंबळकला येत असताना त्रास होत असल्याने सदर महिलेला तिच्या पतीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

सोमवारी सकाळी तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. गावात कोरोनाचा रुग्ण सापडला असे वृत्त समजतात गावात भितीचे वातावरण पसरले. आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे यांनी दोन किमी अंतरावर पर्यत सर्व भाग सील करण्याच्या सूचना ग्रामसुरक्षा समितीला दिल्या. अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व दुकाने चौदा दिवस गाव पुर्ण पणे बंद राहणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post