लॉकडाऊन मुळे विनाअनुदानित नगर जिल्हयातील सातशेवर शिक्षकांची उपासमार : सुनिल गाडगे


नगर,  (दि.27) : जिल्ह्यातील विनाअनुदानित शाळांत सातशेहून अधिक  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून काम करीत आहेत. अनेक आंदोलने, लाठ्या - काठ्या खाल्ल्यानंतर शासनाने दहा वर्षापूर्वी  'कायम' शब्द काढला. पण, त्यानंतर गेल्या पाच ते सहा वर्षात शासनाने विनाअनुदानित शाळांना अनुदानच न दिल्यामुळे शिक्षकांचे आर्थिक शोषण सुरु आहे. लॉकडाऊनमध्ये तर या शिक्षकांची प्रचंड उपासमार होत असून याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अशी मागणी शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे अहमदनगर जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप महिला जिल्हाध्यक्ष  आशा मगर  यांनी केली  आहे. शासनाने  कायम  शब्द  काढून  दहा  वर्षे  झाली.  अनुदान मंजुरीचा विषय गेली सात वर्षे राज्यात गाजतोय. गेली दहा ते पंधरा वर्षे विनाअनुदानित शिक्षक विनावेतन काम करीत आहेत.

आझाद मैदानावर लाठ्या, काठ्या खाल्ल्यानंतर शासनाने दि. 13 सप्टेंबर 2011 रोजी 20 टक्के व 40 टक्के अनुदान मंजुरीचा निर्णय घेतला. तसा आदेशही काढला. या निर्णयाची आजअखेर प्रशासनाने अंमलबजावणी केली नाही.

राज्यातील 1648 शाळा आणि 150 तुकड्यांतील 45 हजार शिक्षक पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सातशे शिक्षकांचा समावेश आहे. या विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना पूर्वी संस्थाचालका कडून तीन, चार हजार रुपये देत होते. शासन अनुदान देण्याची घोषणा केल्यापासून संस्था चालकांनी तेही मानधन देणे बंद केले आहे. बिनपगारावर काम करणार्‍या काही शिक्षकांनी खासगी शिकवणी चालू करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु केला होता. पण लॉकडाऊनपासून या शिक्षकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

जिल्ह्यातील अनेक विनाअनुदानित महाविद्यालयांतील आता प्राध्यापकांनी सुरु केलेले इतर व्यवसायही थंडावले आहेत. लॉकडाऊनच्या काळातही ऑनलाईन वर्ग घेण्याची धडपड करताना शिक्षकांसमोर चरितार्थाचा प्रश्‍न निर्माण झाला आह. याबद्दल शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाने विनाअनुदानित शिक्षकांना न्याय द्यावा. सध्याची वेळ आंदोलने आणि मागण्या करण्याची निश्‍चितच नाही. पण, विनाअनुदानित शिक्षकांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. म्हणूनच या शिक्षकांना शासनाने न्याय देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे ,जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप. कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे. सचिव विजय कराळे. उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष   जितेंद्र आरू .उच्च माध्यमिकेच सचिव महेश पाडेकर .संभाजी पवार. नवनाथ घोरपडे. संजय तमनर .संतोष देशमुख .नंदू नागवडे. सुरेश जगताप .शंकर भिक्सने .राजेंद्र भगत. विलास वाघमोडे. हनुमंत रायकर. सुदाम दिघे. श्रीकांत गाडगे. विलास गाडगे. महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर. सचिव विभावरी रोकडे . कार्याध्यक्ष मिनाक्षी सूर्यवंशी. रोहिणी भोर शकुंतला वाळुंज, छाया लष्करे. जया गागरे. संध्या गावडे. अनघा सासवडकर,  संभाजी चौधरी, अशोक धनवडे, जॉन सोनवणे, रेवन घंगाळे, संतोष मगर, अनिल लोहकरे, अशोक अन्हाड, योगेश हराळे, काशिनाथ मते आदींनी  दिली आहे

Post a Comment

Previous Post Next Post