अर्जुन चंद्रकांत कुलकर्णी यांचे निधन


नगर (दि.11) : नगर शहरातील वृत्तपत्र छायाचित्रकार अर्जुन चंद्रकांत कुलकर्णी (55) यांचे शनिवारी निधन झाले. 

त्यांच्यामागे वडील, पत्नी, एक मुलगा,एक मुलगी, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. शनिवारी सकाळी घराच्या टेरेसवरून पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यामुळे त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

हरहुन्नरी छायाचित्रकार म्हणून ते परिचित होते. सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौकातील प्रसिद्ध औदुंबर फोटो स्टुडिओचे ते संचालक होते.

Post a Comment

Previous Post Next Post