प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व : शिवमती रेखाताई पुरुषोत्तम खेडेकर


महाराष्ट्रामध्ये समाज परिवर्तनाच्या दृष्टीने ज्या महामानवांनी कार्य केले त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज,संत नामदेव,संत तुकाराम,त्यानंतर फुले,शाहू,आंबेडकर या सर्वांच्या पाठीमागे त्यांच्या परिवाराचा आणि पत्नींचा मोठा हातभार होता.म्हणूनच त्यांना कार्य करता आलं.

बहुजन समाजाचं आणि अठरापगड जातीच परिवर्तन व्हावं.या उदात्त दृष्टिकोनातून अनेक महापुरुषांनी आपली कुर्बानी दिली. स्वातंत्र्या अगोदरच्या काळापासून ही परंपरा या देशांमध्ये आहे. आणि तीच परंपरा आमच्या अखंडित रक्तातून सतत वाहत राहिली. आणि स्वातंत्र्यानंतरच्या पिढीमध्येही ती आली. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये ज्या समाजसुधारकांनी समाज परिवर्तन व्हावा. या उदात्त दृष्टिकोनातून काम केलं. त्यामध्ये अनेक महापुरुषांची नावे घ्यावे लागतील. पण त्यामध्ये विशेषतः डॉ.आ.ह.साळुंखे सर, प्रा.मा.म.देशमुख सर आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये एक संघटन उभं करून समाजपरिवर्तन व्हावं. या उदात्त दृष्टिकोनातून कार्य केलं ते युगपुरुष अ‍ॅड.पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांचे नाव अग्रस्थानी घ्यावं लागतं. महाराष्ट्र सरकारने या सर्वांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन या अगोदरच सन्मानित करण अपेक्षित होतं. ते होऊ शकलं नाही ही खेदाची बाब आहे.
अ‍ॅड.पुरुषोत्तम खेडेकर साहेब जे प्रचंड कार्य या महाराष्ट्रामध्ये करीत आहे. त्या कार्याला बळ देण्याचं काम जर कोणी केला असेल तर ते त्यांच्या पत्नी शिवमती रेखाताई खेडेकर यांनी केलं. कारण कुठल्याही व्यक्तीला समाजामध्ये काम करत असताना पत्नीचा पाठिंबा असण आणि ती खंबीरपणे त्या पुरुषाच्या पाठीमागे उभं राहणं हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. आणि ती गोष्ट पूर्ण करण्याचं काम आदरणीय शिवमती रेखाताई खेडेकर यांनी केल आहे.

आदरणीय शिवमती रेखाताई खेडेकर यांनी एका चळवळीच्या खांबाला समाज परिवर्तन करण्यासाठी मोकळीक दिली. तस त्या स्वतःही सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक चळवळीमध्ये सतत अग्रस्थानी राहिल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये पंधरा वर्षे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे काम करून इथल्या बहुजन समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. जीवनाच्या प्रवासात, अनेक माणसे आपल्या जीवनाच्या वाटचालीत एकसष्ठ वर्ष पूर्ण करतात. परंतु काही माणसं असे असतात की त्यांच्या जीवनाच्या वाटचालीमुळे अनेकांचे जीवन प्रकाशमान होतात. म्हणूनच आदरणीय रेखाताई पुरुषोत्तम खेडेकर यांनी ज्या सामाजिक, राजकीय, चळवळीत आपले योगदान दिले व देत आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रसंगाच्या यशापयशाचा सबंध महाराष्ट्रातील समाजाची आहे. त्यांच्या अनेक कृतींनी या मातीला सोनेरी सुगंध प्राप्त करून दिले आहे व देत आहे. माझ्या सारखी अनेक माणसं त्या कारणांनी आदरणीय ताईच्या सहवासात आली.हा सहवास अनेक प्रसंगी जीवनाच्या अनुभूतीला उजाळा देऊन गेला.म्हणूनच रेखाताईच्या विषयी लिहिणे, बोलणे, अगत्याचे आहे.

रेखाताईचा जन्म रायपुर (छत्तीसगड) शहरात 12 एप्रिल 1959 रोजी झाला. त्यांचे माहेरचे कुळ काळे आडनावाचे असून त्यांनी दाणी ही पदवी प्राप्त केलीली होती. त्यांची आई शशिकलाबाई वडील मधुकरराव दाणी (काळे) हे नावाजलेले मालगुजारी होते. अनेक गावावर त्यांचा देशमुखी अंमल होता. रेखाताईचा विवाह 17 जून 1979 रोजी युगपुरुष इंजि.पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासोबत नागपूर येथे झाला.आज एक आदर्श कुटुंब म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.रेखाताईचे पती युगपुरुष अ‍ॅड.पुरुषोत्तम खेडेकर यांनी 1990 मध्ये मराठा सेवा संघाची स्थापना करून वैचारिक व सामाजिक क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांचे जीवन विचार, साहित्य,चळवळ यामधून त्यांची वैचारिक श्रीमंती वारंवार प्रत्ययास येते. ते बोलके दिखाऊ विचारवंत नाहीत तर विचार जगणारे विचारावं आहे. त्यांचे व्याख्यान, साहित्य, वैचारिक व ऐतिहासिक ग्रंथ सामाजिक कार्य, सदैव शिव, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीत कार्य करणार्‍यांना प्रेरणा देणारे आहे. ते कसलाही मुलाहिजा न बाळगता बेधडकपणे प्रतिगामीत्वाचा बुरखा फाडण्याचा त्यांचा स्वभाव आहे. 

युगपुरुष अ‍ॅड.पुरुषोत्तम खेडेकर ही व्यक्ती मळलेल्या वाटेवर चालणारी नाही. हा स्वतंत्र प्रज्ञेचा मनस्वी माणूस आहे. कवी, लेखक, विचारवंत, वक्ता म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. आपल्या आयुष्याची मशाल पेटवून ते सभोतालचा प्रदेश उजळण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.या सर्व गोष्टी करण्यासाठी त्यांना बळ देण्याचे काम त्यांच्या पत्नी आदरणीय रेखाताई खेडेकर यांनी केलं. आणि हे आदरणीय खेडेकर साहेब, रेखाताईवर लिहिलेल्या ’रेखांकन’ या ग्रंथात वेळोवेळी कबुल करतात. की रेखाताईनी हे सर्व कार्य करण्यासाठी मला वेळोवेळी बळ दिलं म्हणून मी हे करू शकलो. याच बरोबर अनेक गोष्टींचा उहापोह साहेबांनी ‘रेखांकन’ मध्ये केला आहे. या ग्रंथातून बहुजन समाजाला तसेच भावी पिढ्यांना आदर्श व  प्रेरणा मिळत आहे. यातूनच रेखाताईची खरी ओळख व महत्व लक्षात येते. यातूनच एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे यशस्वी स्त्रीचा हात असतो हे लक्षात येते. जिजाऊ सृष्टी, बळीराजा संशोधन केंद्र, यासह अनेक प्रकल्पासाठी रेखाताईचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. त्या मराठा सेवा संघाच्या संस्थापक सदस्य तर शिवधर्म पिठाच्या संसद सदस्य आहेत.

यशस्वी राजकारणाची कोणती कसोटी असावी लागते? कार्यकर्त्यांची फळी उभी करणे? निवडणुका लढवणे? निवडणूका जिंकणे? भक्कम जनाधार मिळवणे ? या सर्व बाबी रेखाताई यांच्या तीन दशकांच्या राजकीय कारकिर्दीत जमल्या आहेत. फक्त एकच गोष्ट बाकी आहे ती म्हणजे त्या अजून मंत्री झालेल्या नाहीत. परंतु तेही त्यांच्यासाठी फारसे आवघड नाही, कारण त्यांचे कर्तुत्व एखाद्या मंत्र्यापेक्षाही अफाट आहे. त्या काही एकट्या चिखली किंवा बुलडाणा जिल्ह्याच्या नेत्या नाहीत तर, संपूर्ण महाराष्ट्राच्या नेत्या आहेत. कुशल व मुत्सद्दी राजकारणी म्हणून संपूर्ण राज्यभर त्यांची छाप आहे. सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रात काम करून त्यांनी इतिहास घडविला आहे.

कुठलेही काम करताना त्याच्याविषयी उकल, नियोजन व धडाकेबाज अंमलबजावणी हा रेखाताईचा  स्थायीभाव आहे. कुठलाही निर्णय विचारपूर्वक घेतात.व त्वरित अंमलबजावणी करतात. जनहितासाठी त्या परिणामाची पर्वा करीत नाहीत. त्यांच्या अनेक गुणांची चर्चा सबंध महाराष्ट्रात होते. स्पष्टवक्तेपणा, सरळ स्वभाव, दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द आणि जिजाऊसह महापुरुषांच्या विचारावर श्रद्धा, त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, या विविध गुणामुळे त्यांच्या कोणत्याही कामाची अंमलबजावणी त्वरित होते. व त्याचा त्या जनमानसाच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवू शकतात. त्यांच्या डोळ्यातील स्वाभिमानाची चमक, चालन्यातील दमदारपणा, संभाषणातील स्पष्टवक्तेपणा, हे पैलू त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. इथल्या बहुजन समाजावर सतत होणार्‍या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात कुणालाही न जुमानता काम करण्याचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत.  

रेखाताई यांचा जीवन प्रवास हा सातत्याने प्रवाहाच्या विरुद्धच राहत आला आहे. या जीवन प्रवासामध्ये जणू संघर्षच वाट्याला आला. मातृतिर्थ जिजाऊंच्या भूमीला व भूमीतील जनतेच्या अकांक्षाना मूर्तस्वरूप देण्यासाठी त्या आपले जीवन समर्पित करताना दिसतात. ताई केवळ राजकारण कधीच करत नाही. कारण ताईंचा स्वभावच मुळात एकवचनी आहे. त्यामुळे त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींसाठी कधीच समिट केली नाही, करत नाहीत. राजकारणी व्यक्तीमत्वात किंचित लवचिकपणा असावा लागतो अस म्हणतात पण ताई स्वाभिमानाने ओत-पोत भरलेल्या आहेत. त्यामुळे एक आदर्श राजकारणी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. या सर्व विविध पैलूंचा समन्वय ताईच्या व्यक्तिमत्त्वात आहे. त्याचबरोबर ताई मायाळु आहेत. त्यांचे त्यांच्या सहकार्‍यांवर बंधूवत व पुत्रवत प्रेम आहे. ताई दिलेल्या शब्दाला कायम जागतात. त्यामुळे त्यांच्या राजकारणाला समाजकारणाची झालर आहे. राजकारण हे माध्यम समाजकारणासाठी वापरले म्हणून माँसाहेब जिजाऊची प्रतिमा मंत्रालयात बसवण्यात व शिवजयंतीची तारीख 19 फेब्रुवारी फायनल करण्यात त्यांना यश आले आहे.

रेखाताई स्वतःच्या कर्तृत्वाची पताका संपूर्ण महाराष्ट्रभर फडकवित आहेत. या महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमान दाखवून देत आहे. राजकारण, समाजकारण शिक्षण या क्षेत्रात कर्तुत्व दाखवून देत आहेत. रेखाताई त्यांच्या कर्तुत्वाने असामान्य झालेले आहेत. त्यांच्यात दांडगी इच्छाशक्ती, धाडसी स्वभाव, अशक्यप्राय काम करून दाखवण्याची धमक, सामान्य जनांना जवळ करण्याची शक्ती,व इतर गुणांमुळे त्यांचे व्यक्तिमत्व आगळ,वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.

रेखाताईच्या आयुष्याचे 61 वर्षापैकी पंधरा वर्ष पूर्णवेळ राजकीय जीवन आहे. सामाजिक कार्याला राजकीय अधिकारांची जोड असावी या जाणिवेतून त्यांचे राजकीय जीवन आहे.भारतीय राजकारणाबद्दल प्रसारमाध्यमांसह अनेक ठिकाणी नकारात्मक व टीकात्मक सूर उमटत असताना रेखाताईनी आपल्यापुरते राजकीय जीवन हे स्वच्छ, प्रमाणिक, सेवाभावी, विनम्र ठेवले आहे. हे त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. 

अ‍ॅड.पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी एव्हढीच रेखाताई खेडेकर यांची ओळख नाही तर त्या जिजाऊ, सावित्री, अहिल्यांच्या जातीच्या आहेत. आदर्श वैवाहिक जीवनाच्या शिल्पकार, आदर्श मुलगी, आदर्श बहीण, आदर्श पत्नी, आदर्श आई, आदर्श समाजकारणी, आदर्श राजकारणी आदर्श कुटुंब प्रमुख असून, माझ्यासह लाखो, करोडच्या त्या आजच्या माँसाहेब आहेत.  

त्यांना 22 फेब्रुवारी 2009 रोजी रायपूर येथे हार्टअटॅक आला होता. त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी त्यांची तब्येत अत्यंत गंभीर झाली होती. परंतु जिजाऊंच्या कृपेने त्यातून त्या सहिसलामत बाहेर पडल्या, ही आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. त्या वयाची 61 वर्ष पूर्ण करीत आहेत त्यांच्या 61 व्या जन्मदिनानिमित्त मी जिजाऊ चरणी इतकीच प्रार्थना करतो की,त्यांचे भावी आयुष्य सुख, समृद्धीचे,आरोग्याचे व भरभराटीचे जाओ व त्यांना सशक्त दीर्घायुष्य लाभो.

आदरणीय रेखाताई जन्मदिवसाच्या
 आपणास खूप खूप सदिच्छा !

डॉ.शिवानंद भानुसे
औरंगाबाद
98238 88778

Post a Comment

Previous Post Next Post