गुटखा, पानमसाल अड्ड्यावर छापा ; 25 हजारांचा माल जप्त


 स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई 

नगर (दि.13) :  पारनेर येथे गुटखा, पानमसाल इत्यादी सह तंबाखूजन्य असणार्‍या ठिकाणावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून 25 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. गुटखा पानमसाल्यावर छापा टाकल्याने जिल्हाभर खळबळ उडाली आहे.

गुटखा पानमसासल्याची महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला बेकायदेशीर गुटखा, पानमसाल इत्यादी तंबाखूजन्य पदार्थ सिरज लतिफ इनामदार (रा.रानमळारोड, कान्हूरपठार, ता.पारनेर) हा विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्या माहितीवरुन इनामदार याच्या घरी छापा टाकून गुटखा, पानमसाल इत्यादी तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला. सिरज इनामदार याला पुढील कारवाई साठी पारनेर पोलीसांच्या ताब्यात दिले.

जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर जिल्हा पोलिस अधीक्षक सागर पाटील, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांच्या सूचनेवरून पोहेकाँ दत्तात्रय गव्हाणे, पोना संतोष लोंढे, रविंद्र कर्डिले, पोकाँ प्रकाश वाघ, सागर सुलाने, सागर ससाणे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post