नगर (दि.23) : शहरामध्ये अत्यावश्यक सेवा पुरविणार्यांसह नागरिकांना मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांची अंमलबजावणी न करणार्या शहरामधील 18 नागरीकांवर कारवाईचा बगडा उचलला आहे. नियमांचे उल्लंघन करणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिली.
मास्क न वापरने, रस्त्यावर थुंकणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, उघड्यावर कचरा टाकणे, उघड्यावर शौचालय करणे आदींसंदर्भात मनपाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी दक्षता नियंत्रण पथकांसह स्वच्छता निरीक्षकांकडून कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणानले आहे.
नेप्ती बाजार समिती परिसरात भाजी विक्रेत्यांसह 14 नागरिकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 3 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
सावेडी परिसरात चार जणांवर मास्क न वापरल्याने त्यांच्यावरही कारवाईच करण्यात आली आहे. त्यांना प्रत्येकी 500 रुपयांनी चौघांकडून 2 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या घंटागाडीच्या ड्रायव्हरवरही मास्क न वापरल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरिक्षक राजकुमार सारसर यांनी दिली आहे.
