शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 21 हजार रु. मदत

 नगर, (दि.23) : कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या विळख्यात संपूर्ण जग अडकले असताना या महामारीचा सामना करण्यासाठी राज्य सरकार अत्यंत जबाबदारीने कार्य करत आहे. परंतु कोरोनासारख्या महासंकटाचा मुकाबला करणे केवळ राज्य सरकारचे कार्य नसून, प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार या उपाययोजनेच्या कार्यास हातभार लावणे आवश्यक आहे. याचाच एक भाग म्हणून स्वास्थ्यदर्पण प्रतिष्ठान संचलित शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, धोत्रे बु.ता.पारनेर या औषधनिर्माणशास्त्र पदविका व पदवी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्याकडून सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचे निश्चित करण्यात आले. 

संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रशांत शिंदे, संस्थेचे पदाधिकारी प्रा. सोनाली शिंदे, डॉ. सुनिल आवारी, सुनिल शिंदे, डॉ. नंदकुमार कुलाळ, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मनिषा झावरे, प्रा.प्रियंका साबळे, प्रा. प्रसाद काळे यांनी online  मिटींग घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 21 हजार रु.मदत जमा केली आहे.
 
सध्या लाँकडाऊन सुरू असल्यामुळे शिकवण्याचे कामकाज बंद आहे.परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संस्थेने online वर्ग सुरु केले आहेत. Digital classroom च्या माध्यमातून विविध प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ, सराव परीक्षा व गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तसेच सर्व विद्यार्थ्यांचे समुपदेशन देखील केले जात आहे. या बाबतीत सर्वत्र महाविद्यालयाचे  कौतुक केले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post