घरकुलाच्या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार : खा.विखे पाटील


नगर  : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील एनडीए सरकारने 2022 पर्यंत भारतातील प्रत्येक गोरगरिबाला स्वतःच्या हक्काचे घर देण्याचा निर्धार केलेला आहे, आयुष्यभर  स्वतःच्या हक्काच्या घरापासून वंचित राहिलेल्या समाज घटकातील शेवटच्या माणसाला आपल्या हक्काचे घर आणि निवारा  मिळण्यासाठी  केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे.

मंजूर डीपीआर अंतर्गत घरकुलांच्या निधीसाठी विशेषता केंद्राच्या वाट्याची पैसे संबंधित पालिकेकडे वर्ग करण्यासाठी गृहनिर्माण विभाग भारत सरकार यांच्याकडे व्यक्तिशः पाठपुरावा केला जाईल व त्यासाठी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व नगराध्यक्ष आणि पदाधिकारी यांची भेट भारत सरकारच्या गृहनिर्माण विभाग बरोबर आयोजित करून हा विषय लवकर मार्गी लावण्याचे आश्‍वासन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. श्रीगोंदा नगरपालिकेच्या केंद्र पुरस्कृत योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

याप्रसंगी श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते, नगराध्यक्ष  शुभांगी ताई पोटे, नगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे,उपनगराध्यक्ष, सन्माननीय नगरसेवक , तालुका भाजपचे अध्यक्ष पाचपुते सर, सुभाष डांगे ,पृथ्वीराज नागवडे नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते.  खासदार विखे आपल्या  तालुकानिहाय बैठकांच्या  सत्रात आज श्रीगोंदा तालुक्यात उपस्थित होते. त्याअंतर्गत श्रीगोंदा नगरपालिका आणि  पंचायत समिती श्रीगोंदा याठिकाणी बैठका झाल्या .बैठकीस पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती तहसीलदार विविध विभाग प्रमुख महावितरण सिंचन आरोग्य विभाग इत्यादींचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post