धुलीवंदनाच्या दिवशी गाढवावरून जावयाचे स्वागत...


बीड : धुलीवंदनाच्या दिवशी जावयाचे आगळे वेगळे स्वागत करण्याची आगळी वेगळी प्रथा गेल्या अनेक वर्षापासून रुढ आहे.  बीड येथील एका गावात आगळीवेगळी ही संस्कृती पाहण्यास मिळते. होळीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी जावयास चक्क गाढवावर बसवून गावभर मिरवण्यात येते. यंदा ही परंपरा कायम असून जावईचा शोध घेवून युवकांनी गदर्भसावरीचे मानकरी केले आहे.

या दिवसाची अनेक जण उत्सुकतेने वाट पाहत असतात. या दिवशी जावयास चक्क गाढवावर बसवून गावभर मिरवले जाते. एक मान म्हणून त्यांच्या सन्मानही केला जातो. तालुक्यातील विडा येथे धुलीवंदनाच्या दिवशी जावायला गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची परंपरा मागील अनेक वर्षांपासून अखंडित पणे सुरु आहे. यावर्षी गदर्भसावरीचे मानकरी ठरलेले जावई यांचा सन्मान झाला. या दिवशी काही जावई होळीच्या दिवशीच गाव सोडतात मात्र, येथील युवा पिढी देखील एखाद्या जावयाचा शोध घेतेच  आणि त्यांची मिरवणुक काढतेच ही परंपरा कामय ठेवते.

आज सकाळी सकाळी सातच्या दरम्यान, मटण घेण्यासाठी जावई थांबले होते. यावेळी  काही तरुण युवक जावाई शोधण्यासाठी गेले होते तर हे जावाई अर्थात दाजी दिसले मग लगेच गाडीमध्ये त्यांना बसवून गावात आणण्यात आले. प्रतिवर्षा प्रमाणे अत्यंत उत्साहात त्याच्यासमवेत धुलीवंदन हा सण साजरा करण्यात आला. गावात डीजेच्या तालावर मिरवणूक गाव भर काढण्यात आली. मिरवणूक राजा हनुमान मंदीराच्या पारावर आल्या नंतर जावायाला गावकर्‍याच्यां वतिने  ड्रेसचा आहेर चढवण्यात आला व मिरवणूक संपवण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post