आगरकर मळ्यातील पाण्याच्या टाकींची स्वच्छता सुरू : नगरसेवक अनिल शिंदे


नगर : नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. पाण्यापासून विविध आजार होण्याची शक्यता असते. यासाठी आगरकर मळ्यातील गजानन हौसिंग सोसायटीमधील मनपाची जमिनीवरील पाण्याच्या टाक्याची स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. अनेक वर्षांपासून या टाकीद्वारे आगरकरमळा परिसराला पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याद्वारे मातीचे कण येत आहे, अशी नागरिकांची तक्रार आमच्याकडे आल्यानंतर लगेच महापालिका प्रशासनाला या टाकीची स्वच्छता ताबडतोब करण्यात यावी, अशी मागणी केली. ताबडतोब महापालिका प्रशासनाने टाक्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतले, अशी माहिती नगरसेवक अनिल शिंदे यांनी दिली.
 
 
आगरकर मळ्यातील गजानन होसिंग सोसायटीमधील महापालिकेची जमिनीवरील पाण्याच्या टाक्याची स्वच्छता मोहीमेची पाहणी करताना नगरसेवक अनिल शिंदे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष केशव खानदेशी, बाळासाहेब ठुबे, शहा, आयुबभाई, नवनाथ फाळके आदी नागरिक उपस्थित होते.

शिंदे पुढे म्हणाले की, आगरकर मळ्यामध्ये गेल्या दोन-तीन वर्षापूर्वी अस्वच्छ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यावेळी या परिसरामध्ये कावीळ साथीच्या आजाराची नागरिकांना मोठ्या प्रमाणात लागण झाली होती. पुन्हा अशी घटना होऊ नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. लवकरच पूर्ण दाबाने व स्वच्छ पाणीपुरवठा केला जाईल, असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post