नगर : पुण्यात रुग्ण आढल्याने आता संपूर्ण राज्य सतर्क झाले आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग कामाला लागले असून करोना हद्दपार करण्यासाठी कंबर कसली आहे. करोनाबाबत जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून शहरात ठिकठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावून जनजागृती करण्यात येत आहे. आजपासून फ्लेक्स बोर्ड लावण्यास सुरूवात करण्यात आली आहे. करोनाबाबत काय खबरदारी घ्यावी, काय करू नये याची माहिती फ्लेक्सवर देण्यात आली आहे.
करोनाचे विषाणूचे दोन संशयीत रूग्ण पुण्यात आढळले आहेत. यापार्श्वभूमीवर नगरमधील आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे. दरम्यान, जिल्हा रूग्णालय व बूथ हॉस्पिटलमध्ये करोना कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या दोन्ही कक्षात 40 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. करोनाच्या शंकानिरसणासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे.
हात नियमीत स्वच्छ धुवावेत, खोकताना, शिंकताना रूमालचा वापर करावा. अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये. फळे व भाज्या न धुता खाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान, जिल्हा रूग्णालयाने करोनाबाबत खबरदारी घणेसाठी फ्लक्स लावण्यास सुरवात केली आहे. स्वत: सुरक्षित रहा, दुसर्यांना सुरक्षित ठेवा. काय करावे व काय करू नये यासंबंधी फ्लेक्सव्दारे जनजागृती करण्यात आली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील जनजागृती
आजाराची लक्षणे
1.सर्दी
2.घसा तीव्रपणे दुखणे
3.खोकला
4.ताप
5.श्वास घेण्यास त्रास होणे
6.डाकेदुखी
7.उलट्या व जुलाब
धोकादायल लक्षणे
1.तीव्र घसादुखी
2.38 अंशापेक्षा जास्त ताप
3.धाप लागणे
4.छातीत दुखणे
5.खोकल्यावाटे रक्त पडणे,
6.रक्तदाब कमी होणे
7. नखे निळसर काळी पडणे
8. मुलांच्यामध्ये चिडचीड आणि झोपाळूपणा वाढणे
जास्त धोका कुणाला
1.गरोदर माता
2.उच्च रक्तदाब
3.मधुमेह
4.मुत्रपिंडाचे विकार
5.कर्कराग
6.दमा
7. जुना व सतत बळाणारा खोकला
8. कर्करोगाचे उपचाचर चालू असणार्यांना
आजार टाळण्यासाठी हे करा
* डॉक्टरांच्या सल्याने मास्क वापरा
* गर्दीचे ठिकाणे टाळा
* चेहर्याला हात लावण्यापुर्वी हात स्वच्छ धुवा
* सॅनिटायझर किंवा साध्या साबण-पाण्याने हात वरचेवर धुवावेत
* खोकला किंवा शिंका आल्यास तोंडावर रुमाल किंवा टिशू पेपर धरावा.
* टिशू लगेच कचरापेटीत टाकून द्यावा.
* खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर हात धरु नये
* ताप आणि खोकला असलेल्या रुगणांचा सहवास टाळावा.
* प्राण्यांचा सहवास टाळावा, त्यांना स्पर्श करु नये.
* तुम्ही या विषाणुने पसरलेल्या साथीच्या भागात प्रवास केला असेल आणि जर ताप, खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, गरज वाटल्यास रुग्णालयात भरती व्हावे.
महत्त्वाचे
* पूर्ण शिजलेले शाकाहारी/ मांसाहरी अन्न खावे
* चिकन, मटन प्रमाणिक दुकानातूनच घ्यावे
* तीन लिटर पाणी रोज घ्यावे
* पुरेशी आणि नियमित झोप घ्यावी,
* जागरणे टाळावीत
* धुम्रपान टाळावे
* मद्यपान टाळावे
लक्षात ठेवा
* कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची शंका आली तरी घाबरु नका.
* त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या
* अफवा आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका
* कोरोना विषाणूची साथ लवकरच पूर्ण आटोक्यात येईल.
Tags:
Maharashtra
