उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते ट्रॅक्टरचे वितरण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराजस्व अभियानातर्गत लाभर्थ्यांना ट्रॅक्टरचे वितरण
 
 

नगर  : कर्जत (माहिजळगाव) येथे महाराजस्व अभियान अंतर्गत लाभार्थ्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते टॅक्टरचे वितरण करण्यात आले. 
 
 
यावेळी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल दिवेदी, आमदार रोहित पवार, लहू कानडे, डॉ सुधीर तांबे, राजेंद्र फाळके, माजी आमदार राहुल जगताप,घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, ज्ञानदेव वाफारे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासन स्तरावरून लोकाभिमुख विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा प्रत्येक घटकांपर्यंत लाभ मिळावा हा उद्देश असला तरी, माहितीअभावी या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. यासाठी महाराजस्व अभियान हे उत्तम पर्याय असून , या माध्यमातून जनतेपर्यंत योजना पोहोचवण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या योजनेमधूनच आज कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथे लाभार्थी शेतकर्‍यांना टॅक्टरचे वितरण अजित पवार यांच्या हस्ते  करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post