नगर : खंडकरी शेतकर्याचे प्रकरण मार्गी लावून देण्यासाठी 50 हजार रुपयाची लाच मागणार्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कूळ कायदा विभागातील अव्वल कारकूनला नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दि. 9 मार्च रोजी अटक केली. सुनिल बाबूराव फापाळे असे अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळ कायदा शाखेत अव्वल कारकून म्हणून फापाळे कार्यरत आहे. श्रीरामपूर येथील खंडकरी शेतकर्याचे प्रकरण कायदेशीर मान्यतेसाठी कूळ कायदा शाखेत वर्ग झाले होते. या प्रकरणाची पुढील प्रक्रिया करण्यासाठी फापाळे यांनी सदर शेतकर्याकडे लाच मागितली होती. याबाबत शेतकर्याने लाचलुचपत प्रतिबंकध विभागाकडे तक्रार केली होती. दि. 9 मार्च रोजी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचार्यांनी सापळा लावनू लाच मागणार्या अव्वल कारकून फापाळे याला पकडले.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातच कर्मचारी लाच घेताना पकडला जात असून जिल्हाधिकारी यांचे कर्मचारी आणि जनतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
Tags:
Ahmednagar
