नगर : एटीएस पथकाकडुन जिल्ह्यातील भंगार विक्रेते, हॉटेल्स व लॉजेस, नेट कॅफे, घरमालक भाडेकरू यांची चेकिंग सुरू आहे. देशातील आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर भंगार वस्तु साहित्यातुन बॉम्ब बनविण्याच्या माहितीवरून भंगार विक्रेत्यावर कारवाई सुरू केली. या कारवाईत गुरूवारी (दि.5) शेंडी परिसरातील औरंगाबाद रोडवरील भंगार विक्रेत्यावर कारवाई केली.
या कारवाईत शकिल अहमद खान (वय-50, रा. हमीद पार्क, मुकुंदनगर) याच्या विरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कायदा कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मुशरफ शहजाद खान (वय-35, रा. मुकुंदनगर) याच्या विरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
हॉटेल, लॉजेस, घरमालक भंगार विक्रेते यांनी त्यांच्या व्यवहारातील लेखी नोंद, खरेदी-विक्री, रजिस्टर पावत्या, बिल, नोंदी ठेवाव्यात. या आदेशाचे पालन करावे. त्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रभारी पोलिस अधिक्षक सागर पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकातुन दिला आहे.

Tags:
Ahmednagar