नगरसेवकच आंदोलनाच्या पावित्र्यात

 
शहरासह उपनगरामध्ये रस्त्याच्या कामात खडीचा वापर  : नगरसेवकच आंदोलनाच्या पावित्र्यात

नगर  : शहरामध्ये सध्या विकासमांची मालिका सुरु झाली आहे. मात्र, यात मोठा घोटाळा समोर येण्याची चिन्ह दिसत आहेत. शहरासह उपनगरातील विविध भागात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम हे जोमाने सुरू असून हे खड्डे बुजविण्यासाठी मोठ्या खडीचा वापर केला जात असल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडत आहे. यावरुन नगरसेवकांकडे वारंवार तक्ररी होत असल्याने आता नगरसेवक आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे दिसत आहे.
शहरातील काही भागत आणि उपनगरात सावेडी, गुलमोहोर रोड, पाईपलाईन रोड, भिस्तबाग चौक रस्त्यावरील असलेल्या खड्डयांमध्ये टाकलेल्या जाड खडीमुळे दुचाकी वाहनांना त्यामधून जाताना वाहन चालकांचा अपघात होत आहे. वारंवार खड्याचा समाना करणार्‍यांना आता खडीचा सामना करावा लागत आरहे. या खडीवरुन घसरल्याने वाहन चालकांना आपले हात - पाय गमवावे लागत आहे. छोट्या अपघातांबरोबरच मोठ्याही अपघातांना वाहनचालकांना सामोरे जाण्याचे वेळ येत असून आता नागरीक मनपाच्या या विकास कामांवर चांगलेच रागवले आहेत. त्यातच आता नगरसेवकांनीही त्यांच्या हो मध्ये हो मिळत आंदोलनाला पात्रित्रा घेतला आहे. मनपाने दोन दिवसात या भागातील खड्डयांमध्ये खडी टाकून डांबरीकरण करावे व तातडीने मोठे खड्डे बुजवावे, तसे न झाल्यास पाईपलाईन रोडवर तीव्र आंदोलन इशारा उपनगरातील काही आजी माजी नगरसेवकांनी दिला आहे

या खड्ड्यांमध्ये कसे अपघात होतात याचे प्रात्याक्षिक दुचाकीस्वारांनी करुन दाखवत रस्त्यावर खडीने होणार्‍या अडचणी दाखवून दिल्या आहेत. खडी नव्हे तर चांगले मोठे जाड दगड असल्याने वाहन चालकांना खुपच त्रास होत आहे. दोन दिवसात मनपाने ही कामे केली नाही तर ही खडी गोळा करुन मनपात आणून टाकू असा संतप्त इशारा नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, बाळासाहेब पवार, सचिन गाडे यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. मात्र यावर आता मनपा प्रशासन काय निर्णय घेणार की आहे तशाच

Post a Comment

Previous Post Next Post