हरियाली संस्थेने महाशिवरात्रि निमित्त केले बेलांच्या रोपांचे वाटप



हरियाली संस्थेने महाशिवरात्रि निमित्त केले बेलांच्या रोपांचे वाटप

नगर (दि.21) :- येथिल हरियाली संस्थेच्या वतिने आज भिंगार येथिल प्रसिध्द बेलेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्रि निमित्त भाविकांना प्रसाद म्हणून बेल वृक्षाचे रोपे प्रसाद म्हणून देण्यात आली. 

 महादेवाच्या पुजेसाठी बेलाचे फळ आणि पाने वाहीली जातात.त्या मुळे बेल वृक्षास धार्मिक दृष्ट्या महत्व आहे.शिवाय हा वृक्ष दुर्मिळ प्रजातीत येत असुन औषधी आहे. त्यामुळे या वृक्षांची लागवड होवुन त्याचे संगोपन व्हावे या हेतुने या वृक्षाची लागवड करुन संगोपन करतील अशा इच्छुक भाविकांना संस्थेने बेल वृक्षांचे रोपे विनामुल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आल्याचे हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी येथे बोलताना सांगितले. 

 यावेळी हरियालीचे सुरेश खामकर,मनपा वृक्षाधिकारी उध्दव म्हसे, प्रा.सतिष शिर्के, रंगनाथ सुंबे, संदीप पावसे, यांच्यासह भाविक महिला पुरुष उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post