शाळेच्या आवारातील धोकादायक इमारत आठ दिवसांच्या आत पाडण्याचे आश्वासन
पंचायत समिती सदस्य डॉ. दिलीप पवार यांचे निंबळक शाळेच्या गेटसमोर आंदोलन
नगर (दि.21) : निंबळक येथील जिल्हा परिषद आवारातील धोकादायक मंगल कार्यालयाची इमारत पाडावी या मागणीसाठी पंचायत समिती सदस्य डॉ. दिलीप पवार यांनी शाळेच्या गेटवर आंदोलन केले. आठ दिवसांच्या आत ही धोकादायक इमारत पाडली जाईल असे ओशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी दिल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत बसविण्यात आले.
निंबळक (ता. नगर) येथील जि. प. शाळेच्या आवारात धोकादायक इमारत आहे. या इमारतीचा पाया खचला आहे. भिंतीला भेगा पडल्या आहेत. ही धोकादायक इमारत कधीही पडू शकते. या इमारतीचे निर्लेखन करुन तात्काळ पाडण्यात यावी या संदर्भात गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी या इमारतीची पाहणी करून इमारत धोकादायक असल्याचे सांगितले होते. ही इमारत पाच दिवसांच्या आत पाडावी अन्यथा शाळेत मुले बसू देणार असा इशारा पंचायत समिती सदस्य डॉ. दिलीप पवार,राजेंद्र कोतकर, बी. डी. कोतकर यांनी दिला होता.
मात्र, जिल्हा परिषदेकडून कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे निंबोडीसारखा प्रकार होऊ नये या हेतूने त्यांनी गेटसमोर आंदोलन करून मुलांना पाण्याच्या टाकीजवळ असणार्या झाडाच्या सावलीत बसविण्यात आले. याची दखल घेऊन शाळेला सभापती प्रवीण कोकाटे, उपसभापती रवींद्र भापकर, गट शिक्षणधिकारी रमेश कापरे, उपअभियंता एस.बी. झावरे, गोवर्धन कोतकर, दत्ता कोतकर, नवनाथ कोतकर यांनी भेट दिली.
Tags:
Ahmednagar
