रिक्षा चालकाकडून डॉक्टरास बेदम मारहाण



रिक्षा चालकाकडून डॉक्टरास बेदम मारहाण

नगर (दि.22) : रिक्षा बाजुला घे, असे म्हटल्याचार राग येऊन रिक्षा चालकाने शिवीगाळ, दमदाटी करीत लाकडी दांडक्याने डॉक्टर यास बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना वसंत टेकडी येथील डॉ. पवार हॉस्पिटलसमोर घडली.

डॉ. पवार हॉस्पिटल समोर उभ्या असलेल्या रिक्षास डॉ. राजेंद्र जयसिंग पवार (वय-56, रा. पवार हॉस्पिटल, वसंत टेकडी) यांच्या हॉस्पिटलसमोर रस्त्यात लावलेली रिक्षा (क्र. एम एच 16 सी ई 0247) हिच्या चालकास डॉक्टरांनी रिक्षा बाजुला घे, असे म्हटले. याचा राग आल्याने रिक्षातील सुनील साहेबा शिंदे (रा. वैदुवाडी), सुरेश बाबु शिंदे (रा. खारेकर्जुने) यांनी डॉ. पवार त्यांची पत्नी व मुलगा शिवम् यांना अर्वाच्य भाषेत दमदाटी करून बेदम मारहाण केली. व डॉ. पवार यांना लाकडी दांडक्याने मारहाण करीत जखमी केले. व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी डॉ. राजेंद्र पवार याने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 326, 323, 504, 506 मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार शिरसाठ हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post