निसर्गप्रेमी शिवरायांना..निसर्गपुजनाने अभिवादन !
पाथर्डी तालुक्यात मांडवे या गावातील शिवजयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी
पाथर्डी तालुक्यात मांडवे या गावातील शिवजयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी
नगर (दि.22) : २००३ सालापासुन नगर जिल्हा निसर्गप्रेमी संघटना व जिल्हा जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्र विविध उपक्रमांद्वारे निसर्गरक्षण व निसर्गसंवर्धनाचे कार्य सातत्याने करत आहे. नुकत्याच झालेल्या शिवजयंतीचे औचित्य साधुन या संस्थेने निसर्गसंवर्धनाची शिकवण देणारा आगळी वेगळी शिवजयंती आयोजित केली. जयंती साजरी करताना वेगवेगळ्या प्रकारच्या निरर्थक खर्चास फाटा देवुन ही जयंती संदेशात्मक असली पाहिजे असा या उपक्रमामागचा आणखी एक हेतु होता.
छत्रपती शिवाजी महाराज जेवढे पराक्रमी, धाडशी, संवेदनशिल, चारित्र्यशिल होते, तेवढेच महाराज निसर्गप्रेमीही होते. आपल्या स्वराज्यामध्ये झाडाची फांदीही तोडायला बंदी घालणाऱ्या जाणता राजाने निसर्ग संवर्धनाच महत्व ओळखल होत. काळाच्या ओघात आपण शिवरायांचा हा विचारच विसरलो म्हणुन आज पृथ्वीच अस्तित्व धोक्यात आले आहे. शिवरायांच्या निसर्गसंवर्धन विचाराचा जागर जैव विविधता संशोधन व संवर्धन केंद्र तथा नगर जिल्हा निसर्गप्रेमी संघटनेच्या वतीने पाथर्डी तालुक्यातील मांडवे या गावी आनंदवन येथे शिवरायांचे आज्ञापत्राचे उद्घाटन करून करण्यात आले. या शिवजयंतीची विशेष बाब म्हणजे या उपक्रमाचे अध्यक्ष वड या वृक्षाला करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी जि.प सदस्य पुरुषोत्तम आठरे , भारतीय जैन संघटनेचे योगेशजी बोरा, मोहोजचे सरपंच रामकिसन वांढेकर, मांडवे गावच्या सरपंच सौ सिंधुताई लवांडे, पर्यावरण स्नेही संघाचे अध्यक्ष सचिन चव्हाण, स्वर मानवतेचे संयोजक शिवाजी जाधव व शिवप्रेमी उपस्थित होते. शिवरायांचा निसर्गसंवर्धनाचा विचार प्रत्येक मनापर्यंत पोहोचो हीच शिवचरणी प्रार्थना.... निसर्ग वाचवा तो आपल्याला वाचवेल.
Tags:
Maharashtra

