बनावट कागदपत्र गुन्ह्यातील आरोपीस अटक

 
बनावट कागदपत्र गुन्ह्यातील आरोपीस अटक

नगर (दि.22) : ट्रस्टच्या जागेचे बनावट कागदपत्रे तयार करून, मयत ट्रस्टीच्या जप्ती बनावट इसम उभा करून मृत ट्रस्टी जिवंत भासवुन जागेची परस्पर विक्री करून फसवणुक करणर्‍या टोळीतील प्रमुख आरोपी अन्सार मुनीर शेख (रा. लोणी व्यंकनाथ) यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस व श्रीगोंदा पोलिसांनी संयुक्त कारवाई करून शिताफीने अटक केली. ही कारवाई माळीवाडा येथे गुरूवारी (दि.20) केली.

श्रीगोंदा तालुक्यातील अंजनाबाई भिकाजी ढमढेरे ट्रस्टची बेलवंडी व लोणी व्यंकनाथ येथील ट्रस्टच्या जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून, मृत व्यक्तीच्या नावे तोतया इसमास उभे करून जमीनीची परस्पर विक्री करून फसवणुक करणार्या टोळीतील मुख्य आरोपी अन्सार मुनीर शेख हा माळीवाडा येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून श्रीगोंदा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शोध घेऊन अन्सार शेख याला अटक केली.

ही कारवाई पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील हे.कॉ. संदीप घोडके, रविंद्र कर्डिले, विश्‍वास बेरड, संतोष लोंढे, सचिन अडबल, रवी सोनटक्के यांनी केली आहे. अटक आरोपीस श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले असुन पुढील तपास श्रीगोंदा पोलिस हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post