माजी आमदार वारिस पठाण यांच्या फोटोस नगरमध्ये जोडे मारुन दहन : मनसेचा आंदोलन


माजी आमदार वारिस पठाण यांच्या फोटोस नगरमध्ये जोडे मारुन दहन :  मनसेचा आंदोलन

नगर (दि.22) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने एमआयएमचे माजी आ. वारिस पठाण यांच्या फोटोस जोडे मारुन दहन करण्यात आले. पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मनसेच्यावतीने शनिवारी (दि.22) महात्मा गांधी पुतळ्यासमोर वारिस पठाण यांच्या फोटोस जोडे मारण्यात आले. त्यानंतर हा फोटो जाळण्यात येऊन पठाण यांचा निषेध करण्यात आला.

भारत हा सर्व जातीधर्मात गुण्या गोविंदाने नांदणारा देश आहे. हिंदू - मुस्लिम बांधव एकत्र राहतात. राष्ट्रीय एकतेला धोका पोहचविण्याचे काम पठाण सारखे देशद्रोही करत असतात. अशा देशद्रोह्यांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी. असे देशद्रोही हिंदू- मुस्लिम दंगलीला प्रोत्साहित करण्याचे काम करत असून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली.

या आंदोलनात सचिन डफळ, नितीन भुतारे, मनोज राऊत, इंजि. विनोद काकडे, रतन गाडळकर, गणेश शिंदे, गणेश मराठे, अंबादास गोटीपामूल, अभिनव गायकवाड आदी सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post