। अहिल्यानगर । दि.23 फेब्रुवारी 2026 । राज्यातून गेल्या काही दिवसांपासून थंडी हळूहळू गयब झाली आहे. दोन दिवसामध्ये तर थंडीची जागा उष्णतेने घेतली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. मात्र, याच काळात हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परस्परविरोधी वार्यांच्या स्थितीमुळे वातावरणात हा बदल होत आहे.
थंडीचा निरोप, उन्हळ्याची चाहूल लागली असतानाच, मध्येच आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर जाणवू लागला आहे.
हा पट्टा दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत पसरल्यामुळे राज्यातील अनेक भागांत अचानक वातावरण बदलले असून अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
