| मुंबई | दि. 25 फेब्रुवारी 2026 : भारतामध्ये 25 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले, तर चांदीच्या किंमतीत लक्षणीय घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांचेही लक्ष आजच्या भावांकडे लागले आहे.
पुढील काळात लग्नसराईचे दिवस सुरु होत आहेत. यामधून आता नागरीकांची सोने चांदी घेण्यासाठी गर्दी होवू लागली आहे. दि. 25 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दरात वाढ झाल्याने अनेकांंचा खरेदीचा अंदाज चुकला आहे.
आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 16,179 रुपये असून 22 कॅरेट सोन्याचा दर 14,831 रुपये प्रति ग्रॅम आहे. तसेच 18 कॅरेट सोन्याचा दर 12,135 रुपये प्रति ग्रॅम नोंदवला गेला आहे. जर आपण 10 ग्रॅम दर पाहिला तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,61,790 रुपये, 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,48,310 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 1,21,350 रुपये आहे.
