शाश्वत निराकार परमात्म्याचा बोध प्रत्येक युगाची आवश्यकता : सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज

विश्वबंधुत्वाचा भाव प्रदर्शीत करीत 59व्या निरंकारी संत समागमाची सांगता

शाश्वत निराकार परमात्म्याचा बोध प्रत्येक युगाची आवश्यकता : सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज


। अहिल्यानगर  01 फेब्रुवारी 2026 । महाराष्ट्राचा तीन दिवसीय 59वा वार्षिक निरंकारी संत समागम सांगली मधील चारशे एकर वरील विशाल मैदानावर भव्य रुपात यशस्वीरित्या नुकताच संपन्न झाला. समागमाच्या समापन सत्रामध्ये सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी देश विदेशातील लाखोंच्या संख्येने उपस्थित भाविक भक्तगणांना संबोधित करताना सांगितले, की शाश्वत निराकार परमात्म्याचा बोध प्राप्त करुन जीवनात प्रेम, दया आणि करूणेचा भाव अंगीकारणे ही प्रत्येक युगाची आवश्यकता राहिली आहे.

सतगुरु माताजी पुढे म्हणाल्या की संतजनांचे जीवन दिखावा, कट-कारस्थानापासून मुक्त आणि सहज, सरळ व सकळांच्या कल्याणासाठी समर्पित असते. सतगुरु माताजींनी निरंकारी भक्तांना सत्संग, सेवा व सिमरणाच्या माध्यमातून आत्ममंथन करत सजग व सकारात्मक जीवन जगण्याचे आवाहन केले. 

तीन दिवसीय समागमाची क्षणचित्रे :- शोभायात्रा-पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांचे समागम स्थळी फुलांनी सुसज्जीत रथरूपी वाहनात विराजमान झाले, या वेळी अनेकतेत एकतेचे सुंदर दर्शन घडवीत भक्तांनी पारंपरिक वेशभूषेत नृत्य, गीतांचे सादरीकरण केले तसेच मिशनच्या शिकवणुकीवर आधारित संदेशप्रधान चित्ररथे सामील झाले होते तदनंतर त्या सुसज्जीत वाहनातून दिव्य युगुलाला समागमच्या मुख्य मंचपर्यंत नेण्यात आले यावेळी भक्तांनी स्वागतगीताचे गायन, नृत्य करीत सतगुरूंचे स्वागत केले, या नंतर मुख्य सत्संग कार्यक्रमाला सुरुवात झाली व सत्राच्या शेवटी सतगुरू मताजींनी भाविकांना संबोधित केले.

सेवादल रॅली - : समागमाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सतगुरू माताजी व निरंकारी राजपिताजींच्या पावन उपस्थितीत एक आकर्षक सेवादल रॅली पार पडली  ज्यामध्ये महाराष्ट्रासह अन्य ठिकाणांहून आलेल्या हजारो सेवादल बंधु-भगिनी आपआपली खाकी-निळी वर्दी परिधान करून सहभागी झाले होते, या रॅलीमध्ये बॅंण्डच्या सूरात पी.टी.परेड, संगीतमय योगा, मानवी पिरॅमिड, मल्लखांब, एरोबिक, तसेच अनेक विविध खेळ प्रकार व साहसी कवायती प्रस्तुत केल्या, शेवटी सतगुरू मताजींचे सेवा प्रति मार्गदर्शनपर प्रवचन झाले.

कवी दरबार- : समागमाच्या तिसऱ्या दिवशी 'आत्ममंथन' या विषयावर बहुभाषिक कविसंमेलन पार पडले यात 22 कवी व कवयित्रींनी काव्यपाठ केला ज्याचा भरपूर आनंद श्रद्धाळू भक्तांनी प्राप्त केला. कौस्तुभ पुरस्काराने माताजी सन्मानित-समागम च्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या वतीने प्रतिष्ठित 'राज्यस्तरीय कौस्तुभ पुरस्कार-2026' सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांना सांगलीचे पालकमंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला यावेळी त्यांच्या समवेत पत्रकार संघाचे  अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


निरंकारी प्रदर्शनी -:  समागमस्थळी भव्य निरंकारी प्रदर्शनी उभारली होती त्यात पहिल्या भागात मिशनचा इतिहास, विचारधारा तसेच देश-विदेशात केले जाणारे मानवतेसंबंधी निष्काम सेवा कार्यांचे प्रतिबिंब दर्शवले होते. दुसऱ्या भागात “बाल-प्रदर्शनी” उभारली असून त्यामध्ये बालकांना उज्ज्वल जीवन जगण्याची प्रेरणा देणारे दृश्य होते  प्रदर्शनीच्या तिसऱ्या भाग ‘संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन’च्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देणारा होता.
 

या शिवाय समागमस्थळी श्रद्धाळूंसाठी दिवस-रात्र सुरु असलेली सामूहिक भोजन (लंगर), कैन्टीन्स, स्वास्थ्य सेवेसाठी डिस्पेंसरी,प्राथमिक चिकित्सा केंद्र, कायरोप्रॅक्टिक चिकित्सा केंद्र, प्रकाशन साहित्य स्टॉल्स, पिण्याचे पाणी आदिसह अत्यावश्यक सोयी सुविधा करण्यात आल्या होत्या, निरंकारी सेवादलचे महिला व पुरुष सदस्यांद्वारे स्मितहास्याने, निष्कामपणे सर्वत्र सेवा प्रदान करीत होते, अशा प्रकारे भव्य दिव्य अशा मानवतेच्या महाकुंभातून स्वतःचे आत्ममंथन करण्याची शिकवण घेऊन भक्तगण परतले.

Post a Comment

Previous Post Next Post