लोखंडी गेटची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

लोखंडी गेटची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

​२५ हजार किमतीचा ऐवज लंपास; तातडीने तपासाची मागणी


|अहिल्यानगर | दि.०७ डिसेंबर २०२५ | येथील नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिचोंडी पाटील येथील कोपर बंधारा परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २५ लोखंडी गेट चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे शासकीय मालमत्तेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, लोणी सय्यदमिर (जि. बीड) येथील अमोल पांडुरंग गायकवाड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, दिनांक २९ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ४ ते ३० जुलै २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान चिचोंडी पाटील येथील कोपर बंधाऱ्यावरील ४५ लोखंडी गेटपैकी २५ गेट चोरीला गेले आहेत.

​चोरीस गेलेल्या या काळ्या रंगाच्या लोखंडी गेट्सची किंमत प्रत्येकी ₹१,००० असून, एकूण चोरीस गेलेल्या मालाची किंमत ₹२५,०००/- इतकी आहे. अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने ही चोरी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

​या घटनेची माहिती मिळताच, नगर तालुका पोलीस ठाण्याचे अंमलदार पोहेकॉ/१२७६ दाते यांनी गुन्हा नोंदवला. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ/२०३८ भवार हे करत आहेत. चोरीचा गुन्हा जुना असून, तक्रारी अर्जावरून गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचे नमूद आहे. चोरीचा तपास लवकरात लवकर करावा व चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post