लाडकी बहीण योजना बंद होणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस
। अमरावती । दि.26 नोव्हेंबर 2025 । लोक वेगवेगळी ओशासने देतात. पण आम्ही पोकळ ओशासने देणार्यांपैकी नाही, तर ती पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमच्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. सर्व बहिणींना पंधराशे रुपये मिळायला लागले.
आम्ही पुन्हा निवडून आलो, तेव्हा विरोधकांनी लाडकी बहीण योजना बंद होईल, असा कांगावा सुरू केला. पण, काल-परवा आमच्या सरकारचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला, आम्ही ही योजना बंद केली नाही. जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत कोणीही लाडक्या बहिणींचे पैसे रोखू शकत नाही, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी धारणी येथे बोलताना केला.
Tags:
Maharashtra
