। अहिल्यानगर । दि.09 मार्च 2026 । छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातून हद्दपार करण्यात आले असतानाही हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्याविरूध्द तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी 6 मार्च रोजी दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत श्रीपाद छिंदम याला नगर शहराच्या हद्दीतून निघून जाण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची प्रत त्याच्या घराच्या दर्शनी भागात चिकटवून अंमलबजावणी करण्यात आली होती.
मात्र शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास दिल्लीगेट परिसरात श्रीपाद छिंदम दिसून आला. हवालदार बाबासाहेब इखे आणि त्यांचे पथक तिथे बंदोबस्तावर तैनात होते. प्रशासकीय आदेशाचा भंग केल्याप्रकरणी हवालदार बाबासाहेब इखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून छिंदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags:
Ahmednagar
