साप पकडण्याचा प्रयत्न जीवावर बेतला!

 साप पकडण्याचा प्रयत्न जीवावर बेतला

४० वर्षीय सामाजिक कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू

। अहिल्यानगर । ०6 नोव्हेंबर 2025 ।​ शहरातील सावेडी उपनगरात घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सापाला पकडण्याचा प्रयत्न करत असताना सर्पदंश झाल्याने समीर अशोक इंगळे (वय ४०, रा. किंग्स गेट, ब्राह्मण गल्ली, अहिल्यानगर) या एका परिचित सामाजिक कार्यकर्त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ही घटना बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सावेडीतील गुलमोहर रोडवरील वरदविनायक कॉलनी परिसरात घडली. या भागात साप निघाल्याची माहिती मिळताच समीर इंगळे यांनी धाडसाने त्या ठिकाणी धाव घेतली आणि स्वतःच साप पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. ​मात्र, हा प्रयत्न सुरू असतानाच सापाने त्यांना चावा घेतला. 

सर्पदंश झाल्यानंतर, इंगळे यांना तातडीने उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.​रुग्णालयात उपचार सुरू असतानाच गुरुवारी, ६ नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. समीर इंगळे हे त्यांच्या शांत, मनमिळाऊ स्वभावासाठी आणि विविध सामाजिक कार्यांमधील सक्रिय सहभागासाठी परिसरात परिचित होते. ​त्यांच्या या आकस्मिक निधनाने मंगल गेट, झेंडीगेट आणि सावेडी परिसरासह त्यांच्या मित्रपरिवार व नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे.

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post