कांदा प्रश्नावरून खा. नीलेश लंके यांचा सरकारवर हल्ला
खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात संसदेत कांद्यासाठी आंदोलन
| अहिल्यानगर | दि.13 ऑगस्ट 2025 | कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी मंगळवारी संसद भवनाच्या मकर द्वारासमोर तीव्र आंदोलन केले.
यावेळी खासदारांनी कांद्याच्या माळा गळयात घालून सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त केल्या. आंदोलनाचे नेतृत्व खा. सुप्रिया सुळे यांनी केले. शेतकरी कोमात आणि सरकार जोमात अशी टीका करत खासदार नीलेश लंके यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
या आंदोलनात खा. डॉ. अमोल कोल्हे,खा. नीलेश लंके, खा. भास्कर भगरे, राजाभाउ वाजे, बजरंग सोनवणे यांच्यासह महाराष्ट्रातील इतर खासदार सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना आंदोलकांचा सूर आक्रोशमय होता. विविध खासदारांनी सरकारच्या सध्याच्या धोरणांवर कठोर शब्दात टीका केली.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग