। मुंबई । दि.27 जुलै 2025 । मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्या. तसेच हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ही भेट आता आगामी राजकारणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने राज ठाकरे आज सकाळी कोणालाही कल्पना नसताना अचानक आपल्या घरातून बाहेर पडले आणि मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले.
राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे मातोश्रीवर पोहोचले असून संजय राऊत, अंबादास दानवे यांनी त्यांचे स्वागत केले आहे. राज ठाकरे येताच उद्धव ठाकरे यांनी त्यांची गळाभेट घेतली. हे दृश्य पाहून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला
Tags:
Breaking