। पुणे । दि.27 जुलै 2025 । खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाउस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टी करणार्यांमध्ये 2 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची छापेमारी मध्ये अमली पदार्थ, हुक्का, दारू जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एका नेत्याचा जावई असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला या पार्टीबाबतची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी पार्टीच्या ठिकाणी धाड टाकून तिथे उपस्थित असलेल्या संशयितांना ताब्यात घेतले.
या रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, यामध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. यातील काही जण उच्चभ्रू वर्गातील असल्याची माहिती आहे.
Tags:
Maharashtra