पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची सूचना

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची सूचना

विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनांमध्ये सीसीटीव्ही बसवा

| अहिल्यानगर | दि.26 जुलै 2025 | शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणारी बस व वाहने सुरक्षित असावीत, यासाठी प्रत्येक वाहनामध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिल्या.

पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा शालेय बस सुरक्षितता समितीची बैठक पार पडली. यावेळी घार्गे बोलत होते. बैठकीस महापालिकेचे उपायुक्त विजय मुंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, चंद्रकांत खेमनर आदी उपस्थित होते. 

घार्गे म्हणाले की, प्रत्येक शालेय बस व वाहनामध्ये सीसीटीव्हीची सुविधा कार्यान्वित करण्यात यावी. 6 वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या ने-आण करण्यासाठी बस किंवा वाहनांमध्ये महिला कर्मचारीची नियुक्ती करण्यात यावी. शालेय बस व वाहनांवर अत्यावश्यक दूरध्वनी क्रमांक स्पष्टपणे लिहावा.

अवैध वाहतुकीविरोधात संबंधित विभागांनी संयुक्तपणे मोहिम राबवून दोषी वाहनांवर तातडीने कारवाई करावी. विद्यार्थ्यांची चढ-उतार फक्त शाळेच्या पार्किंगमध्येच सुरक्षितपणे होईल, यासाठी सर्व बसेस तिथेच उभ्या कराव्यात.

रस्त्यावर धोकादायक पद्धतीने चढ-उतार करू नये. प्रत्येक शाळेच्या व्यवस्थापनाने जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करावी. तसेच सर्व शाळांनी परिवहन समितीच्या बैठका नियमित घेण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.

👉 क्लिक करुन वाचा...  

Post a Comment

Previous Post Next Post