घरफोडी करणार्या सराईत टोळीला तोफखाना पोलिसांकडून अटक
5.45 लाखांचा 10 तोळे सोन्याचा मुद्देमाल हस्तगत
। अहिल्यानगर । दि.31 जुलै 2025 । नगर शहरामध्ये घरफोड्या करणार्या चौघा सराईत गुन्हेगारांच्या टोळीला तोफखाना पोलिसांच्या पथकाने अटक केली असून त्यांच्या कडून तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 3 घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या टोळीकडून घरफोड्या करून चोरलेले सोन्याचे दागिने वितळवून त्याची केलेली एकूण 5 लाख 45 हजारांची 100 ग्रॅम लगड पोलिसांनी हस्तगत केली आहे.
कैलास चिंतामण मोरे (राहणार सोनगीर, जिल्हा धुळे), जयप्रकाश राजाराम यादव (राहणार दिनदासपुर, जि.वाराणसी, उत्तर प्रदेश), रविंद्र आनंद माळी (राहणार सोनगीर, जिल्हा धुळे), सुशिल ऊर्फ सुनिल ईश्वर सोनार (राहणार बालाजीनगर, शिंगावे, जिल्हा धुळे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सावेडी उपनगरातील दसरे नगर येथील गणेश सुधाकर मंचरकर यांच्या शिवसुदा रेसीडेन्सी मधील घरातून 15 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 ते सांयकाळी 5.15 चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने 53 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली होती.
👉 गुटखा व सुगंधी तंबाखूची वाहतूक करणारी कार पकडली...
त्यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याच्या तपासत सदरचा गुन्हा हा या चौघा सराईत गुन्हेगारांच्या टोळीने केल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. आरोपींनी वरील प्रमाणे गुह्यांची कबुली देवुन गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देाल काढुन दिल्याने तो तपासात जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण, पोलिस हेड कॉस्टेबला बाळासाहेब गिरी, गोरख काळे, दिपक गांगर्डे, भानुदास खेडकर, सुधिर खाडे, सुरज वाबळे, पो.ना. रमेश शिंदे पो. कॉ. सुमित गवळी, सतिष त्रिभुवन, भागवत बांगर यांच्या पथकाने केली आहे.