| अहिल्यानगर | दि.२९ जुलै२०२५ | सुगंधीत तंबाखू व गुटख्याची विक्री करण्यासाठी थांबलेली कार कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पकडली. ही कारवाई शहरातील पॉलिटेनीक कॉलेजजवळ करण्यात आली. या कारवाईत ३ लाख ९९ हजार ७१२ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शीतल मुगडे, उपनिरीक्षक गणेश देशमुख, गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, पोहेकॉ बाळकृष्ण दौंड, विशाल दळवी, सलीम शेख, विनोद बोरगे, सुर्यकांत डाके, अभय कदम, सत्यजीत शिंदे, अमोल गाडे, अतुल काजळे, सोमनाथ केकाण, महेश पवार, शिरीष तरटे, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, प्रतिभा नागरे, राहुल गुंडू यांच्या पथकाने ही कारवाई केली.
राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या कब्जात बाळगत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यावरून पथकाने सदर ठिकाणी सापळा रचला असता चारचाकी वाहनात एक इसम दिसून आला. त्याने त्याचे नाव शरद अर्जुन पवार (वय ३०, रा. जाम- कौडगाव) असे असल्याचे सांगितले. पोकॉ. सोमनाथ केकाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.