। अहिल्यानगर । दि.19 जून 2025 । शहरातील बागडपट्टी येथे सुरु असलेल्या जुगार अड्डयावर पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गेे यांच्या आदेशानुसार एका पथकाने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत १९ लाख ८० हजारांचा मु्द्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रकरणी अंमलदार महेश सर्जेेराव पाखरे यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई शहरातील बागडपट्टी येथे 17 जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास केली.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल महेश पाखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन महाराष्ट्र जुगार कायदा 1887 चे कलम 4, 5 प्रमाणे गुन्हा दाखल केला पुढील तपास पोलीस हवालदार संतोष गर्जे हे करीत आहेत.
Tags:
Crime