। पुणे । दि.19 जून 2025 । राज्यातील सर्व वारकरी संप्रदायाला आता पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटीची आस लागली आहे. वारकरी संप्रदायातील महत्त्वाच्या आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे (दि.18 जून 2025) देहूमधून प्रस्थान केले.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी बुधवारी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करण्यात आहे. तुकोबांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी देहू संस्थानकडून जय्यत तयारी करण्यात आली.
पहाटे 4.30 वाजता शिळा मंदिरात अभिषेक संपन्न झाला आणि नंतर पहाटे पाच वाजताअभिषेक महापुजा करून पांडुरंगाची आरती करण्यात आली. यावेळी स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक आणि काकड आरती पार पडली.
Tags:
Maharashtra