मनोज जरांगेंचा पुन्हा उपोषणाचा इशारा...

मनोज जरांगेंचा पुन्हा उपोषणाचा इशारा

मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषण


| जालना | दि.१ मे २०२५ |  मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आता मराठा आरक्षणासाठी थेट मुंबईत धडकणार असल्याची घोषणा केली आहे.

आगामी २८ ऑगस्टपर्यंत त्यांच्या ८ ते ९ प्रमुख मागण्या मान्य न केल्यास २९ ऑगस्ट रोजी मुंबईत जाऊन उपोषण करणार असून आता मुंबईतून विजयी यात्रा निघेल अथवा अंत्ययात्रा निघेल असे जरांगे यांनी म्हटले.

यासोबतच, अंतरवाली सराटीत चालू असलेले उपोषणही कायम राहणार आहे. जालनामधील अंतरवाली सराटीमध्ये बुधवारी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी पुढील आंदोलनाची घोषणा केली.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले की, मी मुंबईला जाताना विजयाचा आणि अंत्ययात्रेचा असे दोन रथ घेऊन जाणार आहे. हे केवळ आंदोलन नाही, तर मराठा समाजाच्या आत्मसन्मानाची लढाई आहे.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post