देशात होणार जातीनिहाय जनगणना
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय!
| नवी दिल्ली | दि.१ मे २०२५ | गेल्या अनेक वर्षांपासून देशात जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी होत होती. जातीनिहाय जनगणनेअभावी अनेक राज्यांत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तीव्र झाला होता, अखेर जातीनिहाय जनगणना करण्याचा महत्वपूर्ण निर्णय बुधवारी मोदी सरकारने घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेवून ही माहिती दिली.
कॅबिनेट बैठकीतील या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती देताना मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, सामाजिक रचनेचा विचार करून आणि संविधानातील स्पष्ट तरतुदी लक्षात घेऊन मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
Tags:
Breaking