अहमदनगर पोस्टल सोसायटी ची 105 वर्षाची निरंतर वाटचाल हीच विश्वसनीय सेवेची पावती : हेमंत खडकेकर

। अहिल्यानगर । दि.18 जून 2025 । सन 1920 साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या अहमदनगर पोस्टल सोसायटीची 105 वर्षापासून ची निरंतर यशस्वी वाटचाल हीच संस्थेच्या विश्वसनीय सेवेची पावती असल्याचे गौरव उद्गार नगरचे पहिले वरिष्ठ पोस्ट मास्तर हेमंत खडकेकर यांनी काढले.

संस्थेच्या वार्षिक सभेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खडकेकर  पुढे म्हणाले की, अहिल्यानगर जिल्हा हा सहकाराची पंढरी म्हणून ओळखला जातो. आजच्या स्पर्धेच्या युगात सहकारी संस्था टिकाव धरण्यात मागे पडत आहेत. परंतु पोस्टल सोसायटी 105 वर्षापासून कार्यरत आहे. यामध्येच या संस्थेच्या संचालक मंडळाची विश्वासार्हता लक्षात येते. निरंतर सेवा आणि तत्पर कामकाजाने संस्थेचा अलेख वाढत चालला आहे.


संस्थेची वार्षिक सभा नुकतीच अहिल्यानगर येथे संस्थेचे चेअरमन रामेश्वर ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. विविध विषयावंर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.


सभेच्या विषय पत्रिकेतील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक प्रफुल्लकुमार काळे यांनी संस्थेच्या आर्थिक स्थितीची माहिती सभासदांना दिली.संस्था सभासदांना अल्पाव्यज दराने मुलामुलींच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी तसेच घर बांधण्यासाठी कर्ज देते. कर्जाची वसुली नियमितपणे पगारातून होत असल्याने संस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत आहे. संस्थेने आपला ऑडिट वर्ग ‘अ‘ कायम राखून यावर्षी सभासदांना कायम ठेऊन 10.5 टक्के व्याज व शेअर्सवर 7 टक्के लाभांश दिलेला आहे.

यावेळी अहिल्यानगरचे वरिष्ठ पोस्ट मास्तर हेमंत खडकेकर श्रीरामपूर विभागाचे सहाय्यक डाक अधीक्षक संदीप हदगल, पोस्टल सोसायटीचे व्हाईस चेअरमन सुनील कुलकर्णी, संचालक निसार शेख, महेश तामटेे, प्रमोद कदम, सलीम शेख, स्वप्ना चिलवर, अर्चना दहिहंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव गौरव पत्र व रोख बक्षीस देऊन करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त सभासदांचा यशस्वी सेवापुर्ती करिता शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

संस्थेची कार्यकारी संचालक प्रफुलकुमार काळे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन प्रमोद कदम यांनी मानले.  यावेळी संस्थेची सभासद सतीश येवले, दत्तात्रय जासूद, राम धस, सचिन अस्वर, संदीप मिसाळ, सुखदेव पालवे, धनंजय दैठणकर, कवीश्वर ताकपेरे, राजेंद्र राहींज ,सचिन गायकवाड, गणेश केसकर, अमोल बोरुडे, अंबादास सुद्रिक, बलराम दाते, सुनील चांडोले, विजय चाबुकस्वार, अविनाश आढाव, कैलास भुजबळ, अरविंद वालझाडे, गोरक्ष आचार्य, जय मडावी, अर्जुन जटाळे, शंकर कडभने, हर्ष कांबळे, आजिनाथ खेडकर, सुनील जाधव, सागर जाधव, शुभांगी मांडगे, ज्योती कांबळे, अर्चना भडके, पदमराज पडलवार, संतोष झावरे, व्यवस्थापक नितीन वाघ आदीसह मोठ्या संख्येने सभासद हजर होते.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post